हडपसर पोलीस हद्दीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा, मुलींची सुटका…!
हडपसर : हडपसर पोलिस हद्दीतील रॉयल लॉजिंग वर छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रॉयल लॉजिंग देविका प्लाजा बिल्डीग, हरपळे पार्क, फुरसुंगी रोड, पुणे येथे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून वेश्या व्यवसाय चालत आहे.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. गोपनीय माहिती प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलिस अमंलदार यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.
यामध्ये चौकशी केली असता रॉयल लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याचे आढळून आले. यामुळे याठिकाणी छापा टाकून सदर ठिकाणावरून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
यावेळी लॉजचे मालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक गैरव्यवहार होत आहेत. पण, कारवाया मात्र बोटावर मोजण्या एवढ्याच होतात.
सामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणत त्रास होत आहे. यामुळे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.