Hadapsar News : धक्कादायक! डोळा मारून फ्लाईंग किस, जाब विचारताच महिलेच्या पतीला मारहाण, हडपसर पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा..
Hadapsar News : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला डोळा मारून फ्लाईंग किस करुन हाताने इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे १३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
बुधवारी (ता.२०) एका ३२ वर्षाच्या महिलेने याप्रकणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत वणवे (वय.४० रा. हडपसर) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. Hadapsar News
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच परिसरात राहतात. १३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला रस्त्याने जात असताना आरोपी गल्लीमध्ये उभा होता. आरोपीने महिलेकडे पाहून डोळा मारला. तसेच फ्लाईंग किस करुन हातवारे केले.
दरम्यान, याबाबत महिलेने तिच्या पतीला सांगितले. महिला आणि तिचे पती याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी प्रशांत वणवे व त्याच्या पत्नीने फिर्य़ादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.