पूर्व हवेली व हडपसर भागाचा सामावेश करुन स्वतंत्र महापालिका करण्यासहीत तालुक्याचे पूर्व, पश्चिम व मध्य अशा तीन भागात महसुली विभाजन करावे ; हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी मागणी…!


उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यातील सर्व गावांचा सामावेश हडपसर महापालिकेत करुन पुणे शहरातून हडपसर भाग वगळून स्वतंत्र महापालिका स्थापित करण्यासहीत तालुक्याचे पूर्व, पश्चिम, मध्य अशा भागात तहसिल कार्यालयाचे विभाजन करा अशी लक्षवेधी मागणी हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली आहे.

 

 

 

 

 

 

हडपसर चे आमदार चेतन तुपे यांनी हडपसर व पूर्व हवेली तालुक्यात वाढत असलेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रश्न मांडताना म्हणाले, हवेली तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे विभाजन करून छोट्या ग्रामपंचायती करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता . मात्र, मोठ्या ग्रामपंचायतीमधून कामे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुणे महापालिकेकडून पूर्व पुण्यावर, हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच आता हडपसरची, पूर्व हवेलीतील काही गावे मिळून नवीन महापालिका करावी अशी मागणी तुपे यांनी सभागृहात केली आहे.

 

 

 

 

 

 

याचबरोबर हवेली तालुक्यात तहसिल कार्यालयाचा वाढता व्याप्त पाहता, हवेली तालुक्‍याचे महसुली विभाजन करणे आवश्यक आहे. महसुली विभाजन झाल्यास एकापेक्षा जास्त तहसीलदार, अधिकारी मिळू नागरीकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्या सहीत नागरी सुविधा मिळण्यासाठी मदत मिळणार आहे.

पुणे महापालिकेकडून हडपसर भागात लक्ष दिले जात नसून पूर्व हवेली तालुक्‍यात ग्रामपंचायत स्तरावर सुविधा देणे अशक्य होत असल्याने एक-दोन गावे तालुक्‍यातून बाजूला काढण्यापेक्षा पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका करण्यात यावी. हडपसरला ‘ब’ दर्जाची स्वतंत्र महापालिका केल्यास विकास होईल. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार तुपे यांनी विधानसभेत केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!