Gunaratna Sadavarte : मोठी बातमी! जरांगे पाटील यांना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांचे मोठे वक्तव्य…
Gunaratna Sadavarte : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. तीन तरुणांनी सदावर्ते यांच्या घराच्या खाली येऊन ही तोडफोड केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर या ठिकाणी राहत असून त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. Gunaratna Sadavarte
मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? असा सवाल करत मनोज जरांगे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.
वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी वाहनांची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला.
हीच का मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? असा सवाल करतानाच मला कोणीच शांत करू शकणार नाही, असा इशाराच गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.