ग्रामपंचायत सदस्याची बायको लाखो रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली, नंतर नवऱ्याला…

कोल्हापूर : येथील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लखन बेनाडे यांच्या पत्नीनेच त्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी 8 लाख रुपये हडप करून घरातील दागिने घेऊन पत्नीने प्रियकरासोबत पळ काढला आहे. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नंतर पत्नीला परत न्यायचं असेल तर 3 लाख रुपये दे अशी मागणी प्रियकरनेच केली आहे. बेनाडे यांच्या तक्रारीनंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली 2 वर्ष काम करत आहे. 2023 मध्ये बेनाडे यांची लक्ष्मी लोंढे या महिलेसोबत ओळख झाली.
असे असताना मात्र लक्ष्मी लोंढे हिचे विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध होते. विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाले आणि लक्ष्मीने विशालपासून सुटका व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला. नंतर लखन बेनाडे आणि लक्ष्मी लोंढे यांचा विवाह झाला. लग्न होताच लक्ष्मीने पुन्हा विशाल गस्तेच्या मदतीने लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागितले.
त्यांनी अनेक निमित्त करून लक्ष्मीने लखनकडून 8 लाखांहून अधिकची रक्कम काढली. लखन बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीने सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखन यांना सोडून विशाल गस्ते सोबत पुन्हा पळून गेली यामुळे त्यांना एकच धक्का बसला. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लखन बेनाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात सक्रिय होते. असे असताना पत्नीनेच त्यांची फसवणूक केल्याने ते सध्या अडचणीत आणि चर्चेत आले आलेत. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.