बीड प्रकरणी सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप होतात, आरोपींचे का सापडत नाही?


बीड : बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन २५ दिवस झालेत पण अद्यापही समिती कार्यान्वित होऊ शकलेली नाही.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? विष्णू चाटे या आरोपीचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येणार आहे, परंतु या आरोपीचा मोबाईल अजूनही सापडत नाही.

विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा CDR सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

राज्यकर्त्यांनी मिळमिळीत भूमिका बघता जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली कार्यक्षमता तर अजितदादांनी आपला निडरपणा दाखवायला हवा.

वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करून संपूर्ण राज्यालाच वेठीस धरायचे नसते आणि ते राज्याच्या हिताचेही नसते, याचे स्मरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!