गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका, म्हणाले, तू कोणाची औलाद आहे? काहीतरी गडबड..


मुंबई : भारतीय राजकारणात वैचारिक मतभेद असणे हे लोकशाहीसाठी स्वाभाविक आहे. पण हे मतभेद सभ्यतेच्या चौकटीत मांडले गेले पाहिजेत, ही एक पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली राजकीय परंपरा आहे. भाजपा आमदार जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली आहे.

तू कोणाची औलाद आहे, काहीतरी गडबड. तसेच राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करत टीका केली आहे. यामुळे पडळकरांवर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका ही अत्यंत खालच्या पातळीची असून, त्यातून त्यांनी स्वतःचे बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवून आणले आहे.

स्व. राजाराम बापू पाटील यांची लोकनेते म्हणून असलेली ओळख ही त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यामुळे निर्माण झाली होती. त्या महान परंपरेचा गौरव वाढवण्याऐवजी, आज गोपीचंद पडळकर यांनी पाटील कुटुंबाच्या मातोश्रींवर केलेली अवमानकारक टीका ही लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे.

असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. आजवर महाराष्ट्रातील नेत्यांनी परस्परविरोधी राजकीय भूमिकांमध्ये राहूनही सभ्यतेची संस्कृती टिकवून ठेवली होती. परंतु भाजपच्या काही नेत्यांनी ही संस्कृती बिघडवण्याचे काम सुरू केले असून, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंक लावणारे आहे.

तसेच मी या अशोभनीय वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करतो आणि भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांना समाजातून कठोर विरोध व्हावा, ही अपेक्षा व्यक्त करतो. असेही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!