आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! २२ कॅरेटचं सोनं ‘एवढ्या’ रूपयांनी झाले स्वस्त..

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
तसेच भारत-पाक तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात थोडी चढ-उतार दिसून येत होती. पण आता सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याचा भाव खाली उतरले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली, चीन अमेरा यांच्यातील ट्रेड डीलमुळे डॉलर इंडेक्समध्ये मजबुती मिळाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भावात घसरण पाहायला मिळाली. पाहूयात goodreturns संकेतस्थळावर १८,२२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत किती आहे.
दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोनं प्रति तोळा १६५०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे प्रतितोळा सोन्याच्या किंमत ८८,९५० रूपये इतकी झाली आहे. १० तोळे म्हणजेच १०० ग्राम सोन्यासाठी ८,८९,५०० रूपये इतके रूपये मोजावे लागतील. शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. २२ कॅरेटच्या १० तोळं सोन्यासाठी शनिवारी ९०६००० इतके रूपये मोजावे लागत होते. आता हेच सोनं ८८९५०० रूपये इतके झाले आहे.
२४ कॅरेटच्या सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं १८०० रूपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९७,०३० रूपये इथकी झाली आहे. तर १० तोळे सोन्याची किमत १८००० रूपयांनी घसरून ९,७०,३०० रूपये इतकी झाली आहे.