दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोड बातमी! लाडकी बहीण’ योजनेचे पैसे खात्यात; E-KYC न केलेल्यांना पैसे मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिवाळी सणाच्या तोंडावरच हा हप्ता वितरित करण्यात आल्यामुळे राज्यातील ‘लाडक्या बहिणींची’ दिवाळी आजपासूनच गोड होणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत सुरूवातीला ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसीची अट शिथिल करण्यात आली होती. यामुळे तांत्रिक अडचण असूनही अनेक पात्र भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थींना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जरी सप्टेंबरचा हप्ता KYC शिवाय जमा झाला असला तरी, ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
दरम्यान, ज्या लाभार्थ्यांनी अजूनही E KYC केली नाही त्यांना ती तातडीनं पूर्ण करा. दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार आहे. या E KYC साठी नवरा किंवा वडिलांचं आधार कार्ड जोडणं बंधनकारक आहे. त्याशिवाय E KYC ची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकांनी ही अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीणच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही EKYC करु शकता.