आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, 24 तासात पुणे-नाशिकसह अनेक ठिकाणी धुवाधार बरसात होणार….

पुणे : सध्या अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे.

सध्या दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती आहे. यामध्ये भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.
यामध्ये 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून 6 जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात येत्या 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यासह अनेक बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे.

यामध्ये येत्या 6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. यामुळे येणाऱ्या काळात जोरदार पाऊस पडेल असेही सांगितले जात आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी जोरदार पूर्वतयारी करत आहेत.
यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली. नाशिकमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.