आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात प्रतितोळा 5000 रुपयांनी घसरण! जाणून घ्या आजचे दर..


मुंबई : आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 96 हजार 593 रुपयांवर आला आहे. 22 एप्रिल रोजी हा दर 1 लाख 2 हजार 73 रुपयांपर्यंत होता. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात जवळपास 5 हजार 480 रुपयांची घट झाली आहे. ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जात आहे.

सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे 20 दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. भारत-पाक युद्ध थांबल्यामुळे आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध टळल्यामुळे आंतरारष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी सुरु आहेत. तसेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे.

यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या फायद्याची आहे. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

तसेच, जागतिक बाजारात सोन्याची मागणीत काहीशी घट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मार्ग अवलंबला असून, त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. सोनं दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे, सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते.

असे असताना मात्र, जागतिक बाजारातील चढ-उतार लक्षात घेता, गुंतवणुकीचा निर्णय घेताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. सध्या अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात जवळपास 5 हजार 480 रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!