आनंदाची बातमी! अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त; आजचे ताजे दर पाहून घ्या लगेच…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. अक्षय्य तृतीया अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात अचानक घट झाल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून येत असून सध्या दर नरमल्याचे चित्र आहे. 18 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,54,340 रुपयांवर आला आहे. तर मुंबई मध्ये याच सोन्याची किंमत 1,54,190 रुपये इतकी नोंदवली गेली.

यापूर्वीच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची म्हणजेच सुमारे 1.01 टक्क्यांची घसरण होऊन दर 1,56,200 रुपयांवर पोहोचला होता. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ही घट ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

देशातील इतर शहरांमध्येही जवळपास समान दर दिसून आले. कोलकाता आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,41,340 रुपये असून 24 कॅरेटसाठी 1,54,190 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नई येथे दर सर्वाधिक असून 24 कॅरेटसाठी 1,55,010 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 1,42,090 रुपये इतकी किंमत आहे. पुणे आणि बंगळूरू येथे 24 कॅरेट सोनं 1,54,190 रुपये आणि 22 कॅरेट 1,41,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतींमध्येही नरमाई दिसून येत आहे. स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4,786.90 डॉलर इतका नोंदवला गेला आहे. जागतिक पातळीवरील तणाव काहीसा कमी होण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!