आनंदाची बातमी! आठवड्याच्या शेवटी सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या..


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे.  गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्या-चांदीच्या दरात सततची वाढ पाहिल्यानंतर अखेर आठवड्याच्या शेवटी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज २२ मार्च २०२५ रोजी या दोन्ही मौल्यवान धातूंनी किंमतीत घट नोंदवत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

गेल्या चार दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराला शुक्रवारी ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने थेट 440 रुपयांनी माघार घेतली. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सोन्याने उच्चांकी झेप घेतली. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी वाढ, तर गुरुवारी 220 रुपयांची वाढ झाली होती.

आता गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आयबीजेएच्या आकडेवारीनुसार…

24 कॅरेट – ₹88,169

23 कॅरेट – ₹87,816

22 कॅरेट – ₹80,763

18 कॅरेट – ₹66,127

14 कॅरेट – ₹51,579 प्रति 10 ग्रॅम

चांदी 2100 रुपयांनी घसरली ..

दरम्यान, सोनेप्रमाणेच चांदीनेही गेल्या चार दिवसांत दरवाढ अनुभवली होती. मात्र शुक्रवारी चांदीच्या किमतीत थेट 2100 रुपयांची घट झाली. आज सकाळच्या सत्रात देखील घसरणीचे संकेत मिळत आहेत.

सोमवारी – ₹100 घसरण

मंगळवारी – ₹1100 वाढ

बुधवारी – ₹1000 वाढ

गुरुवारी – ₹100 वाढ

शुक्रवारी – ₹2100 घसरण

आता एक किलो चांदीचा दर ₹1,03,000 इतका आहे (गुडरिटर्न्सनुसार). IBJA नुसार हा दर ₹97,620 प्रति किलो आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group