तिरूपती बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शहरांमधून धावणार विशेष एक्सप्रेस गाड्या, जाणून घ्या..


मुंबई :तिरूपती बालाजी हे देशातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान मानलं जातं. देशभरातून भाविक दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने येत असतात. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आता प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे महाराष्ट्रातील अकोला, नांदेड आणि अमरावती येथून विशेष एक्सप्रेस गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि दिवाळीसारख्या सणांदरम्यान यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, अकोला ते तिरूपती आणि नांदेड ते तिरूपती दरम्यानच्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला असून, त्या नियोजित वेळापत्रकानुसार ठराविक दिवशी धावणार आहेत. यामुळे भाविकांना आता दर्शनासाठी प्रवासात अधिक सोय आणि सुलभता मिळणार आहे.

गाडी क्रमांक 07606 (अकोला-तिरूपती) ही विशेष गाडी यापूर्वी 29 जून 2025 पर्यंतच चालणार होती. मात्र आता तिचा कालावधी वाढवून 6 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी 8.10 वाजता अकोला येथून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता तिरूपती येथे पोहोचते.

दरम्यान, त्यानंतरची परतीची सेवा – गाडी क्रमांक 07605 (तिरूपती-अकोला) – ही गाडी आता 4 जुलै 2025 ते 27 मार्च 2026 या कालावधीत दर शनिवारी दुपारी 12.30 वाजता तिरूपतीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.15 वाजता अकोला येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 07189 (नांदेड–तिरूपती):

कालावधी -4 जुलै ते 25 जुलै 2025

प्रस्थान – प्रत्येक शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता नांदेडहून

पोहोचणे -दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता तिरूपती

गाडी क्रमांक 07190 (तिरूपती–नांदेड)

कालावधी – 5 जुलै ते 26 जुलै 2025

प्रस्थान -प्रत्येक शनिवारी दुपारी 2.20 वाजता तिरूपतीहून

पोहोचणे – दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता नांदेड

गाडी क्रमांक 07015/07016 (शनिवार-रविवार सेवा):

07015 (नांदेड–तिरूपती) – 5 जुलै ते 26 जुलै, प्रस्थान दुपारी 4.50

07016 (तिरूपती–नांदेड) -6 जुलै ते 27 जुलै, प्रस्थान दुपारी 4.40

एकूण फेर्‍या -16

अमरावती-तिरूपती आठवड्यातून दोन वेळा सेवा :
गाडी क्रमांक 12766 (अमरावती–तिरूपती):

प्रस्थान – प्रत्येक सोमवार आणि गुरूवार

परतीची गाडी (12765) – मंगळवार आणि शनिवार

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!