साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता सर्वसामान्य भाविकांनाही मिळणार व्हिआयपी आरतीचा लाभ…


शिर्डी : २०२४ वर्ष संपून २०२५ म्हणजे नववर्षाला सुरूवात झाली. सर्वांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे . देशात तिरुपती बालाजीनंतर शिर्डीतील साई मंदिर सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. शिर्डीतील साई मंदिरात देशभरातून भाविक आणि व्हिव्हिआयपी येत असतात.

साई मंदिरात साई बाबांची व्हिआयपी आरती करण्याचा मान फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींना दिला जात होता. परंतु नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर साईबाबा संस्थानने नियमात बदल केला आहे. या संस्थानने नवीन उपक्रम सुरु केला आहे.

त्यानुसार सर्वसामान्य भाविकांना साई मंदिरातील व्हिआयपी आरतीचा लाभ मिळणार आहे. साई मंदिर संस्थानच्या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना व्हिआयपी आरतीचा लाभ मिळणार आहे. सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या दोन भाविकांना व्हिआयपी आरती करता येणार आहे.

दरम्यान, या व्हिआयपी आरती फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच करता येत होती. परंतु हा लाभ सामान्य भाविकांना देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्याला सुरुवात आजपासून करण्यात आली.

पंढरपुरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर संस्थानकडून साईभक्तांसाठी नवे वर्षाची नवी अनोखी भेट दिली आहे. व्हिआयपी आरती थेट साई समाधीजवळ उभे राहून करता येते. दिवसभरातील मध्यान, धुपारती आणि रात्रीच्या शेज आरतीत ही संधी मिळणार आहे.

त्यानुसार बुधवारी झांसी येथील मनिष रजक आणि त्यांची पत्नी पुजा रजक या दांम्पत्यास व्हीआयपी आरतीचा लाभ मिळाला. आरतीचा मान मिळाल्यानंतर रजक दांम्पत्य भावूक झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!