रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दिवाळी-दसरा स्पेशल रेल्वेचे वेळापत्रक जाहीर, टाईमटेबल आताच पाहा..

पुणे : दसरा, दिवाळी आणि छठपूजा या प्रमुख सणांच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच 2 ऑक्टोबर ला दसरा आणि १८ ऑक्टोबर ला दिवाळी असून शनिवार २५, मंगळवार २८ ऑक्टोबर दरम्यान छठ पूजा आहे

अर्थातच ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा महिना आहे, आणि दरवर्षी अशा प्रमुख सणांच्या काळात प्रवाशांची विशेष गर्दी पाहायला मिळते. या गर्दीला लक्षात घेता रेल्वे विभागाने उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे- हजरत निजामुद्दीन मार्गांवर अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वेच्या संपर्क कार्यालयाने बदलेल्या वेळापत्रकाबद्दल माहिती दिली आहे.

रेल्वे असो वा बस दिवाळी-दसऱ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या कुटुंबासोबत हे सण साजरा करण्यासाठी आपल्या कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे प्रवास करतात. या काळात सर्वात जातं प्रवास केले जातात.
या सगळ्याचं गोष्टींचा विचार करून त्यांनी या सणांच्या काळात रेल्वेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले आहेत. पुणे-हजरत निजामुद्दीन आणि हजरत निजामुद्दीन-पुणे मार्गांवर दर आठवड्याला ठराविक रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ केरण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोईचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे.
रेल्वे विभागाने केलेल्या बदलानुसार गाडी क्रमांक ०१४९३ ची विशेष एसी गाडी पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गांवर धावणार आहे. ६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी सायंकाळी ५.३० वाजता सुटून दुसऱ्या दुवाशी रात्री 8.00 वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचेल. एकूण १२ फेऱ्या या गाड्यांच्या ठरवल्या आहेत.
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गसोबतच गाडी क्रमांक ०१४९४ ही गाडी हजरत निजामुद्दीन-पुणे मार्गावर देखील विशेष धावणार आहे.७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार आणी शुक्रवरी ही गाडी हजरत निजामुद्दीन-पुणे धावेल.
रात्री ९.२५ मिनीटांनी ही गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकावरून पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण १२ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या असून प्रवाशांच्या सोईसाठी हे बदल केल गेले आहेत. प्रवाशांना या विशेष सुविधेमुळे प्रवास करणे सोईचे ठरणार आहे.
दरम्यान, पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गसोबतच गाडी क्रमांक 01494 ही गाडी हजरत निजामुद्दीन-पुणे मार्गावर देखील विशेष धावणार आहे. ७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार आणी शुक्रवरी ही गाडी हजरत निजामुद्दीन-पुणे धावेल.
रात्री ९.२५ मिनीटांनी ही गाडी हजरत निजामुद्दीन स्थानकावरून पुण्याकडे निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण १२ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या असून प्रवाशांच्या सोईसाठी हे बदल केल गेले आहेत.
प्रवाशांना या विशेष सुविधेमुळे प्रवास करणे सोईचे ठरणार आहे. प्रवासाला या कळत प्रवाशांना जास्त वेळ लागण्याची शक्यता असते, त्यामुळे नियोजित प्रवास करण्याची शिफारस रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केली आहे.
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गांवर रुजू केलेल्या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांसाठी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी सणांच्या काळात वाढणारी गर्दी रेल्वे प्रवाशांसाठी देखिल कसोटी असते. या नवीन वेळापत्रकामुळे प्रशासनाला या गर्दीला सांभाळणे सोपे होईल. प्रवाशांना गर्दीची विशेष अडचण होणार नाही
प्रवाशांच्या सोई बरोबरच रेल्वे विभागाची सुविधा आणि सुसुत्रता देखील सुधारली जाईल. रेल्वे विभागाने प्रवाशांना प्रवासाची माहिती देण्यासाठी संपर्क कार्यालयाद्वारे अपडेट्स दिले आहेत.