लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ महिलांना मिळणार पैसे, महायुतीच्या मंत्र्याने दिली योजनेबाबत दिली महत्वाची माहिती..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
आतापर्यंत या योजनेंतर्गत एकूण ९ हाप्ते लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे या योजनेबाबत आता उलट -सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे.
यावर आता मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हाप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत, ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या, त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत.
या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत, त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल, असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. एप्रिलचा हाप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.