ईलेक्ट्रीक वाहने, मोबाईल घेणारांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी घेतला सर्वांच्या मनातला निर्णय…

नवी दिल्ली : मोदी सरकारने आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये आता ईलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ईलेक्ट्रीक वाहनांमधील महागडी असलेली बॅटरीच स्वस्त करण्यात येत आहे.

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये बॅटरी नसलेल्या वाहनाची किंमत जेवढी त्याहून अधिक या बॅटरीची किंमत असते. सीतारामण यांनी या बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. कोबाल्ट हा महागडा पदार्थ देखील स्वस्त केला जाणार आहे. यामुळे गाडीचीच किंमत कमी होणार आहे.
दरम्यान, या घोषणेमुळे केवळ इलेक्ट्रीक वाहनेच नाही तर मोबाईलही स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती कमी होणार आहेत. याचा फायदा नव्याने ईव्ही घेणा-यांना होणार आहे. यामुळे आगामी काळात याबाबत लोकांची पसंती वाढणार आहे.

सध्या ज्या लोकांनी ईव्ही घेतल्या आहेत, त्यांची बॅटरी खराब झाली तरीही त्यांना नवी बॅटरी बदलताना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली.
त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. या घोषणेमुळे मात्र पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत महागडी असणारी ईलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून किमती किती कमी होणार हे मात्र पुढे आले नाही.
