Gold Rate Today : सोन्याच्या दरात वारंवार चढ- उतार, आजचे दर काय?, जाणून घ्या…

Gold Rate Today : देशभरात सातत्याने सोने- चांदीच्या दरामध्ये चांगलेच चढ- उतार बघायला मिळत असून हे दर स्थिर होत नसल्याने विविध कार्यक्रमासाठी दागीने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या मनात गोंधळ बघायला मिळत आहे.

तसेच आज शनिवारीही (ता.१३) नागपुरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आहे. नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर शनिवारी सकाळी ११ वा म्हणजेच आज सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार १०० रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. हे दर ९ जुलैला ७२ हजार ६०० रुपये होते.
तर ११ जुलैला ७३ हजार १०० रुपये नोंदवण्यात आले. त्यापूर्वी काही महिन्यापूर्वी हे दर ७२ हजार रुपयाहून खालीही गेले होते. त्यामुळे सोन्याच्या दरात सतत चढ- उतारामुळे सोने खरेदी करायची केव्हा याबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण होतांना दिसत आहे.

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही सराफा बाजारात कमी- अधिक प्रमाणात ग्राहकांची रेल- चेल दिसत आहे.
नागपुरात १३ जुलैला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७३ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. Gold Rate Today
हे दर ९ जुलैला २४ कॅरेटसाठी ७२ हजार ६०० रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ५०० रूपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार २०० रुपये होते. त्यामुळे सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सोने- चांदीच्या दरात लवकरच आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे हा काळ ग्राहकांना दागिने खरेदीसाठी चांगला असल्याचा त्यांचा दावा आहे.