Gold Price : सोन्याच्या दरात वर्षाअखेरीच वाढीचा वेग! जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर…


Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी लग्नसराईमुळे पुन्हा वाढली आहे. त्याच बरोबर सोन्या चांदीचे दरही वाढले आहेत. कालच्या तुलनेत किंचितशी घसरण असली तरी मागच्या काही दिवसांच्या तुलनेत ही दरवाढ असल्याचं म्हणावे लागले

गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचे दर वाढले आहेत. दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. Gold Price

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७२,००० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.२४ कॅरेट सोन्याचा भाव ७८, ६०० रुपयांच्या आसपास आहे. दिल्ली, मुंबई, पाटणा, जयपूर, लखनऊ या देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा भाव काय होता ते येथे जाणून घ्या.

देशात एक किलो चांदीची किंमत फक्त ८९,७०० रुपये आहे. सलग दोन दिवस घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात १३०० रुपयांची घट झाली आहे.

मात्र, आज सोन्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. २०२५ मध्ये सोन्याच्या किमती चांगला परतावा मिळेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यानंतर १० ग्रॅम सोन्याचा दर ९०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!