सोन्या चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढले, किती रुपयांची झाली वाढ? वाचा पुणे मुंबईतील किमती…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.
त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
आज, सोमवारी (ता.१४) सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, सोमवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९४,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८६,१८५ रुपये आहे.
तर १ किलो चांदीचा भाव ९४,६८० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९४७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते. सोन्याची पारदर्शकता तपासता येते. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या..
मुंबई – २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८६,०३८
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९३,८६०
पुणे – २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८६,०३८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,८६०
नागपूर – २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८६,०३८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,८६०
नाशिक – २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८६,०३८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,८६०