धक्कादायक! पुण्यात युट्यूबवर फेमस होण्यासाठी केला मुलींचा वापर, प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार अन्…


पुणे : युट्युबर तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. युट्युबरने अनेक तरुणींची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. संबंधित युट्युबराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवनाथ सुरेश चिखले (रा. पुणे) असे अटक केलेल्या युट्युबरचे नाव आहे .युट्युबरच्या जाळ्यात अडकलेल्या अशाच एका तरुणीने पोलीस ठाण्यात सदर फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी ही कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह राहते. तर आरोपी युट्युबर नवनाथ चिखले हा पुण्यात राहणारा असून तो मनोरंजन म्हणून युट्युबवर गाण्यांचे अल्बम तयार करतो, त्यामुळे तो युट्युबर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच फेब्रुवारी २०२१ ला पीडित तरुणीने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी करून आपलं प्रोफाईल अपलोड केले होते.

हेच प्रोफाईल पाहून आरोपीने शादी डॉट कॉमवर लग्नास उत्सुक असल्याचा मॅसेज पाठवून पिडीतेकडून तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर पीडितेला युट्यूबवरील स्वतःचे रील आणि व्हिडीओ दाखवून आकर्षित करत पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

सुरुवातीला युट्युबरने काही बहाण्याने पीडित मुलीला आपल्या बँक अकाऊंटवर अडीच लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, त्या मुलीने ऑनलाईन पैसे पाठवले. त्यातच जून 2021 मध्ये आरोपी मुलीच्या घरी आला आणि घरात एकटीला पाहून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र मुलीने नकार देताच, आता आपण लग्न करणार आहोत, असं बोलून त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर पीडित मुलीने लग्नाचा तगादा लावला असता, आरोपीने सांगितले की, त्याला अजून युट्युबमध्ये करियर बनवायचं आहे, घर घ्यायचे आहे आणि त्यासाठी खूप पैसे लागतील, असे बहाणे तो देऊ लागला. त्यानंतर पीडित मुलीने घरातील दागिने विकून आणि बँकेतून कर्ज काढून युट्यूबरला ४७ लाख ५० हजार रुपये दिले. यानंतर आता तर लग्न करू शकतो ना? असा तगादा पीडितेने लावताच त्याने उडवाउडवीची उत्तरं देत लग्नास नकार दिला.

लग्नाचं अमिष दाखवून आपली लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली, घडलेला सर्व प्रसंग पोलिसांना सांगताच त्यांनीही डोक्यावर हात मारून घेतला.

मात्र प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसानी तात्काळ आरोपी नवनाथ चिखलेवर भादंवि कलम ३७६, ४२० कलमांनुसार गुन्हा दाखल केला. कल्याण-भिवंडी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!