Ghazipur News : भीषण अपघात! लग्नाला चाललेल्या बसवर पडली हायव्होल्टेज विजेची तार, चार जणांचा जागीच मृत्यू…

Ghazipur News : उत्तर प्रदेश येथील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

या आगीत बसमधील चार जणांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर अली आहे. तसेच बसमधील इतर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
ही बस एका लग्न समारंभासाठी जात असताना वाटेत हाय टेंशन वायर बसवर पडल्याने बसला आग लागली. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. या बसमध्ये ५० प्रवासी होते, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बस एका लग्न समारंभातून परतत होती. त्यावेळी मरदह येथे हा अपघात झाला. मऊ येथील कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन बस मरदह येथील महाहर धाम येथे येत होती. त्यावेळी बसचा अपघात झाला. बसमध्ये ५० हून अधिक लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. Ghazipur News
या आगीत बसमधील चार जणांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर अली आहे. तसेच बसमधील इतर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, गाझीपूरमधील अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.