दौंडमधील पिंपळगावमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम ना राडा ना गोंधळ ! गावकऱ्याचं परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम…!

दौंड : पिंपळगाव (ता. दौंड) येथे गारदीबाबा यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील च्या इतर कार्यक्रमाप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये देखील राडा होणार अशा प्रकारची चर्चा सुरू होती. मात्र येथील गारदीबाबा उत्सव समितीने व स्थानिकांनी केलेलं परफेक्ट नियोजन यामुळे गौतमी पाटील चा येथील कार्यक्रम करेक्ट झाला असेच म्हणावे लागेल.
गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या कलेने चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा चांगला फॅन फॉलोवर्सचा वर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगली चर्चा असते. तिच्यावर होणाऱ्या टीकेला ती मात्र संयमाने उत्तर देते. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला तरुणांची तुडुंब गर्दी होताना पहावयास मिळते.
याचदरम्यान , पिंपळगाव येथे देखील दहा हजारापेक्षा जास्त रसिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती . यावेळी गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले होते. रंगमंचापासून सुमारे 30 ते 40 फूट बॅरिगेट लावण्यात आले होते. समोरच्या बाजूला सर्व महिला बसल्या होत्या.ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला.