Gautami Patil : अखेर गौतमी पाटीलचे लग्नाबाबत मोठे वक्तव्य, म्हणाली, मला ‘तोच’ नवरा हवाय..

Gautami Patil मुंबई : नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. तिचा चाहता वर्ग देखील जास्त असून अनेकजण तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका केली जाते. (Gautami Patil)
तर याबरोबरच आतापर्यंत यामुळे अनेक वादही निर्माण झाले आहेत. पण तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. ती लग्न कधी करणार याची तिचे चाहते वाट बघत आहेत. तर आता तिने त्यावर भाष्य केले आहे.
गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. तिच्या अदांमुळे अनेक तरुण घायाळ होतात. तर आतापर्यंत तिला अनेकांनी लग्नाची मागणीही घातली आहे.
गौतमी पाटीलचा (Gautami Patil )बॉयफ्रेंड कोण? ती लग्न कधी करणार याची अनेकदा चर्चा रंगत असते. तर आता गौतमीनेच या चर्चांबद्दल मौन सोडत तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा हे सांगितलं आहे.
गौतमी पाटील म्हणाली, मी इतक्यात लग्न करणार नाही. माझ्या मनात जोपर्यंत येत नाही किंवा माझी आई मला जोपर्यंत म्हणत नाही, आजही माझ्या घरात माझ्या लग्नाचा विषय निघतो. तू लग्न कधी करणार? असे मला विचारत असतात.
त्यामुळे घरचे जेव्हा ठरवतील आणि मला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा मी लग्न करेन. मी अरेंज मॅरेज करेन. मी आतापर्यंत अनेक गोष्टींमधून गेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारणारा नवरा मला हवा आहे.
ती पुढे म्हणाली, माझ्या नवऱ्याची पसंती माझ्या आईचीही असेल आणि माझीही असेल. आईची पसंतीही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मी आईला एकटीला कधीही सोडू शकत नाही.
मी घरी आल्यावर आई मला दिसली नाही तर माझी चिडचिड होते. तिला मला कोणी नाही आणि माझ्याशिवाय तिला कोणी नाही. त्यामुळे याचाही विचार मी लग्न करताना निश्चितच करेन.