गँगस्टर लॉरेन्सचा बुकीला धमकीचा कॉल, रेकॉर्डिंग झाले व्हायरल

दिल्ली : सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीचा कॉल आला आहे. याबाबत कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल झाली आहे. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्याने गुगल नामक बुकीला धमकी देताना दिसत आहे.
यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. तो बुकीला व त्याच्या कुटुंबाला कच्चा चावून खाईन अशी धमकी देताना दिसून येत आहे. यामुळे आता तपास सुरू आहे.
असे असताना पोलिस तपासात हे रेकॉर्डिंग २०२१ ची सांगितले जात आहे. त्यावेळी लॉरेन्स राजस्थानच्या अजमेर तुरुंगात बंद होता. यामुळे याचा तपास सुरू आहे.
हा बुकी दिल्लीचा सचिन जैन असल्याचे बोलले जात आहे. तो सध्या दुबईत आहे. लॉरेन्सने या बुकीकडून ४० लाख रुपये उकळले होते.
त्यानंतर हा पैसा हवालाद्वारे कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारला पाठवण्यात आला. त्यानंतर याच पैशांतून पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसाठी आधुनिक शस्त्रे खरेदी करण्यात आली. यामुळे आता तपासाला गती मिळाली आहे.