Ganesh festival : गणपतीला कोकणात जाण्यासाठी आता तिकीट मिळणार, १० मे पासून बुकिंग होणार सुरू, जाणून घ्या…
Ganesh festival : गणेशोत्सव आणि कोकण यांचे वेगळेच नाते आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी दोन महिने आधीपासूनच तयारी करावी लागते. रेल्वेने कोकणात जाणं म्हणजे खूप आधीपासूनच तिकिटांचे बुकिंग करावे लागते. रेल्वे प्रशासनदेखील गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडते.
चाकरमानी कोकणात जाण्यासाठी जास्तकरुन रेल्वेवरती अवलंबून असतात. कारण रस्ते मार्गाने कोकणात जायचे म्हंटले की प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळं अनेक जण रेल्वेवर अवलंबून असतात. आता कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग १० मेपासून सुरू होत आहे.
तसेच दरवर्षी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरातील नागरिक गणपतीसाठी कोकणात दाखल होतात. यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामुळं त्याच्या १२० दिवस आधीपासूनच म्हणजे १० मेपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळं यंदा चाकरमान्यांना कन्फर्म तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. Ganesh festival
दरवर्षी गणेशोत्सवाचे तिकिट मिळवण्यसाठी तिकिट खिडकींवर सकाळपासून रांगा लावाव्या लागतात. मात्र, तिकिट खिडकी उघडताच कन्फर्म तिकिटाची आशाही संपून जाते. गणपतीसाठी यंदा १० मे पासून तिकिटाचे बुकिंग सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर तिकिटांचे बुकिंग करावे, असे अवाहन करण्यात येत आहे. तसंच, गणेशोत्सव स्पेशल गाड्याही लवकरच सोडण्यात येतील. व तशे जाहीर करण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.
असा असेल शेड्युल…
रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवार ४ मे २०२४ रोजी १ सप्टेंबरचं रेल्वे आरक्षण सुरु होईल. तुम्ही आयआरटीसी व अँपवरून बुकिंग करु शकता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग मंगळवार ७ मे रोजी सुरु होईल.
दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी हरतालिका असून याच बुकिंग गुरुवारी ९ मे पासून सुरु होईल. ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून यादिवशी घरोघरी गणरायांचे आगमन होईल. तेव्हा ७ सप्टेंबरचं रेल्वे बुकिंग शुक्रवार १० मे रोजी सुरु होईल.