महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार ! जयंत पाटलांनंतर आता अजितदादांचे पोस्टर…!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राष्ट्रवादीत देखील अनेक गट असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील पोस्टर काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे लावण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा, अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकले होते.
याबाबत शरद पवार म्हणाले की अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल. मात्र सध्या आमच्याकडे त्यासाठीचे संख्याबळ नाही. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते.