रोल्स रॉयल्सपासून ते रेंज रोवरपर्यंत आलिशान कारचे साम्राज्य, सावकार नानासाहेब गायकवाडच्या लक्झरी कार्स जप्त..


पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात अजून इतर अनेक बाबी समोर आल्या. त्यात हगवणे कुटुंबियांचा नातेवाईक आणि आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर त्यांच्यावर खंडणीचा आरोप करणारा पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड याची मायानगरी आणि घबाड पोलिसांसमोर आले.

नानासाहेब गायकवाडची मायावी संपत्तीही उघड झाली आहे. पोलिसांनी गायकवाडच्या रोल्स रॉयस, रेंज रोवर, मर्सिडीज, ऑडी, पजेरो आणि इतर महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत.

नानासाहेब गायकवाडने सावकारीच्या जीवावर मोठं आर्थिक साम्राज्य उभारलं. लोकांकडून जमीनी ताब्यात घेणे आणि त्यावर व्याजाचे साम्राज्य उभे करणे, हेच त्याचं मुख्य आर्थिक चक्र होतं. याच माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती त्याने जमवली होती.

गणेश आणि नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून कारागृहात पाठवले होते. मात्र मागील दीड महिन्यापासून दोघंही पोलिसांना गुंगारा देत होते.

दरम्यान, गायकवाडवर आधीच गुन्हे दाखल असून, आता वैष्णवी हगवणे प्रकरणात आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडून खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्या मालमत्तेवर हात घातला आहे.

जप्त करण्यात आलेल्या आलिशान कार्समध्ये विशेष म्हणजे प्रत्येक गाडीवर “४४४४” हा व्हीआयपी नंबर आहे. जप्त गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे…

मर्सिडीज – JH 12 F 4444

रोल्स रॉयल्स – MH 12 RF 4444

रेंज रोव्हर – JH 10 K 4444

इनडेव्हर – MH 12 TH 4444

पजेरो – MH 12 HB 4444

ऑडी – MH 14 GY 4444

या गाड्या सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर गुन्हेगारी मालमत्तेचा ठपका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!