आता रस्ते अपघातात जखमींवर ७ दिवस मोफत उपचार, आणि दीड लाख मिळणार, जाणून घ्या केंद्र सरकारची योजना..

नवी दिल्ली : आपल्या देशात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस ट्रिटमेंट योजनेची घोषणा केली. ही योजना रस्ते अपघातातील जखमींसाठी लागू असणार आहे. देशभरात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात १ लाख ८० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये १८ ते ३४ वयोगटातील ६६ टक्के लोकांचा समावेश आहे. यातील अपघातग्रस्त लोकांना वेळीच उपचार मिळाले, असते तर त्यातील काहींचे प्राण वाचले असले. अनेकदा वेळीच उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
जे पेशंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतील त्यांच्यावर ७ दिवसापर्यंत उपचाराचा खर्च किंवा १.५ लाख रुपये तातडीने दिले जातील. ही कॅशलेस ट्रिटमेंट योजना काय आहे, ती केव्हा लॉन्च होणार, त्याचा कोणाला फायदा मिळणार आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १४ मार्च २०२४ रोजी, रस्ते चंदीगडमध्ये रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पायलट प्रकल्प सुरू केला. यामध्ये अपघातात जखमी झालेल्या लोकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार होत्या. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता चंदीगडनंतर या योजनेचा आणखी ५ राज्यांमध्ये विस्तार करण्यात आला. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. ७ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात या योजनेच्या अधिकृत सुरुवातीची घोषणा केली. यामुळे उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
यामध्ये अपघातानंतर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जारी करेल. अपघातानंतर २४ तासांत पोलिसांना कळवणे, अपघाताची माहिती, जखमींची परिस्थिती पोलिसांना माहिती देणे. तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीचे दोन्ही टप्पे पार केल्यानंतर जखमींची फाईल तयार होईल त्यात पोलीस रिपोर्ट ओळख पत्र जमा करावे लागेल.
यामुळे तिन्ही टप्प्याचे पालन केल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील. ज्यामुळे अपघाताच्या दिवसापासून पुढील ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातील. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात याचा फायदा होणार आहे.