आधी मुहम्मद-महादेव वाद, नगरमध्ये तणाव, नंतर मराठी आणि आता स्व. बाळासाहेब ठाकरेंबाबत वाद, शेतकऱ्यांचा मदतीचा मुद्दा संपवला?


सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.आमदार रोहित पवार म्हणाले, मी गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत असून शेतकरी, शेतमजूर पूर्णतः उध्वस्त झाल्याचे दिसत आहे. दिवाळी काय दसरा सुद्धा शेतकरी -शेतमजूर साजरा करू शकत नाहीत.

मराठवाड्यात तर जीवनमरणाचा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, एवढी भीषण परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राचे मुळ प्रश्न काय आणि चर्चा मात्र कशावर घडत आहे? आधी मुहम्मद-महादेव वाद, नंतर अहिल्यानगरमध्ये तणाव, नंतर भिवंडीत मराठीत बोलण्याचा वाद जाणूनबुजून उकरून काढला.

मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केल जात असल्याची शंका आता मात्र विश्वासात बदलली आहे. आणि आता तर सर्व सीमा ओलांडून अत्यंत खालची पातळी गाठत स्व. बाळासाहेब यांच्यावरून वाद उभा केला आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यकर्त्यांना काय साध्य करायचं हे माहित नाही, पण राज्यकर्त्यांच्या या वागण्याला आणि राजकीय चिखलाला महाराष्ट्र कंटाळला आहे, हे मात्र नक्की. शेतकरी शेतमजूर वाचवा, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरी सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का? हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!