राज्यात युतीची पहिली घोषणा! भाजप ४१, राष्ट्रवादीला ८ जागा, शिंदे गटाचे टेन्शन वाढलं…


पुणे : राज्याच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीमध्ये फुटीची पहिली ठिणगी पडली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीची घोषणा केली असून शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे दिसण्याची चिन्हे आहेत. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसांचा अवधी असताना दुसरीकडे बहुतांशी ठिकाणी जागा वाटपांच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राज्यात युतीची पहिली घोषणा करण्यात आली आहे. भाजप ४१ जागांवर आणि राष्ट्रवादी ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

       

दरम्यान, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत महायुतीतील दोन घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेनेला डावलत थेट स्थानिक युती केली आहे. या युतीतील जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगराध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्षपदासह आठ जागा आणि एक स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले आहे.

या नव्या समीकरणामुळे महायुतीतील तिसरा घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. राज्यात सत्तेत असूनही स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेले मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!