मुंबईत अग्नितांडव ; जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती…


पुणे : मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील बेह्रमपाडा परिसरातील जे.एन.एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना सकाळी १०:५१ वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. दोन ते ३ मजल्यापर्यंत आग पसरली आहे. या आगीत अनेकजण अडकल्याची भीती आहेआग लागल्यामुळे आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

या आगीत अडकलेल्याना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य केले जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलासोबत पोलिस, १०८ अॅम्ब्युलन्स सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांसह वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!