दुर्दैवी ! छत्रपती संभाजी नगरात एमआयडीसी ला आग , सहा कामगार जिवंत जळाले..!!

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला भीषण आग लागल्याची मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री उशिरा १० कामगार झोपेत असतांना या कंपनीत भीषण आग लागली. सनशाईन एंटरप्रायझेस, एक हातमोजे बनवणारी कंपनी, सी २१६, वाळुंज औद्योगिक क्षेत्रामध्ये २० ते २५ कामगार काम करतात. कंपनीतच १० कामगार राहत होते.
तसेच, काल रात्री सर्वजण झोपलेले असताना अचानक उष्मा वाढल्याने झोपलेले काही कर्मचारी जागे झाले. अश्या भीषण आगीत बाहेर पडने शक्य नव्हते, मात्र काही कामगारांनी पत्रे उचलून झाडाच्या साहाय्याने बाहेर आले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारखान्याला आग लागली होती. यावेळी स्थानिक लोकांनी सांगितले की, कारखान्यात ६ लोक अडकले आहेत. यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आत जाऊन ६ मृतदेह बाहेर काढले. त्याचवेळी कंपनीत आग लागली तेव्हा १०-१५ कर्मचारी आत झोपले होते, असे सांगण्यात आले. यातील ४ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले, मात्र ६ जणांचे प्राण वाचू शकले नाही.