अखेर कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून नांदणी मठाची महाराणी उर्फ माधुरी हत्तीणी ही चर्चेचा विषय बनली होती. या हत्तीणीला परत आणण्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.वनताराचे साईओ विहान कर्णीक आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांची बैठक पार पडली. या बैठकीत महादेवी हत्तीणीला परत कोल्हापुरात नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरकरांचा हा मोठा विजय आहे.
नांदणी मठातील’ माधुरी’ हत्तींणीला पुन्हा मठात आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती. कोल्हापूरकरांनी जिओच्या वस्तूंवरही बहिष्कार टाकला होता. कोल्हापूरकरांनी रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. कोल्हापूरकरांचा रोष पाहता वनताराने महाराणी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्याच्या निर्णयावर वनिताच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पीटीशन दाखल करु. आम्ही नांदणी मठात महाराणीसाठी चांगलं घर बनवू, तिची चांगली व्यवस्था करु आणि इथे घेऊन येऊ, अशी बाजू कोर्टात मांडू. त्यामुळे त्याचा निकाल सकारात्मक येईल, ही आमची आशा आहे. अनंत अंबानी यांनी निर्णय घेतला आहे की, त्यांना कोल्हापूरकरांना दु:ख द्यायचं नाही. सर्व कोल्हापूरकारांच्या माधुरीची आपण चांगल्याप्रकारे तिची काळजी घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. पण कोल्हापूरकरांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर माधुरी कोल्हापुरात लवकरात लवकर कोल्हापुरात यावी. यामध्ये हत्तीचा विजय आहे. आम्ही सर्वांना सांगू की, जी व्यवस्था वनतारामध्ये आहे ती कोल्हापुरात करु. आम्हाला कुणाला दुखवायचं नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे
कोल्हापूरकरांच्या रोषानंतर वनताराकडून कोल्हापूरच्या नागरिकांची माफी देखील मागण्यात आली होती. विशेष म्हणजे कोल्हापूरकरांची माफी मागितल्यानंतर वनतराची टीम आज पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली. वनताराची टीम, सीईओं यांची दुसऱ्यांदा कोल्हापुरात चर्चा झाली. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग इथे नांदणी मठाचे मठाधिपती, लोकप्रतिनिधी आणि वनताराच्या साईओंची चर्चा झाली. या बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.