अखेर पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची तारीख आली समोर, ‘या’ दिवशी मिळणार हप्ता…


नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला १४ वा हप्ता जारी होऊ शकतो.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ईकेवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ईकेवायसी केली नसेल आणि तुमच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक केलेले नसेल तर 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही.

यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी केला होता.

देशभरातील 8 कोटींहून जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. परंतु, तरीदेखील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान असे शेतकरी किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606 आणि 155261 वर कॉल करून चौकशी करू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!