गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा ; तरुणांची स्टेजसमोर हाणामारी…!

पुणे : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांची एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आला आहे. पोलिसांना हा सगळा राडा थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतर हा राडा आटोक्यात आला.
खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. दरम्यान रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली.
दरम्यान, या कार्यक्रमात ग्रामीण डोंगराळ भागातील तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत चांगलाच धुडगूस घातला. यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. त्यामुळे पुन्हा एकदा धुडगूस घातल्यामुळे गौतमीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला. यावेळी अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. आणि यानंतर हा कार्यक्रम संपल्याचे आयोजकांने सांगितले.