इर्शालवाडी दरडीखाली ६० लोकं अडकल्याची भिती व्यक्त, ५० ते ६० घरे संपूर्ण उद्वस्त..!!


पुणे : सध्या पावसाचे दिवस सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शालगड वाडीवर दरड कोसळली असून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

यामुळे राज्यात पुन्हा एकदा माळीण घटना झाल्याचे दिसून आले. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. काही नागरिक सुखरूप वाचले तर काही अद्यापही दरडीखाली अडकले. अनेक जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळीण गावावर दरड कोसळून सुमारे अडीचशे जण ठार झाले होते. त्याची पुनरावृत्ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील दुर्घटना असे मानले जात आहे. यामुळे ही मोठी घटना आहे.

दरम्यान, मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. ही ५० ते ६० घरांची वस्ती असून इर्शालगड डोंगरावरील काही भाग कोसळल्याने जीवितहानी झाली आहे.

यामध्ये अनेक जण गाडले गेल्याची भीती. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या च्या NDRF दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून आणखी दोन टीम्स रवाना झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!