वडिलांचे विवाहबाह्य संबंध, आर्थिक अडचणी?, दिशा सालियान प्रकरणी मोठा खुलासा..

मुंबई : दिशा सालियान आरोप प्रत्यारोपांचा फैरी होत असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती.
कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केले होते. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. या अहवालात डोक्याला गंभीर इजा होऊन दिशाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती.
याबाबत दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य सबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं. या गोष्टींमुळेच तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे.