खासदार नवनीत राणांना कोर्टाकडून दणका ; जात प्रमाणपत्र फसवणूक प्रकरणी वडीलांना फरार घोषीत…!


अमरावती  :  बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खा. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित करण्यात आले आहे. तर कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

शिवडी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रावर निर्णय देताना वडील हरभजनसिंग कौर हे न्यायालयात गैरसमज राहत असल्याने वॉरंट पाठवून गैरहजर राहत असल्याने शिवडी कोर्टाकडून त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. तसेच कौर यांना हजर राहण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला आहे.

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर कारवाई होत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंग कौर यांच्यावर फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोघांवर मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिनाभरात दोनदा वॉरंट बजावले होते.

दरम्यान त्याविरोधात राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत, या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिकाही दाखल केली होती. ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!