धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, ११ जखमी..
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. हा अपघात बेलगव्हान घाटामध्ये झाला आहे.
या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातले काही जण पोहरादेवीला निघाले होते. नवस फेडण्यासाठी ते जात होते. तेव्हा लोकनायक बापूजी अणे स्मृतीस्थळाजवळ बेलगव्हान घाटात गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की जागीच ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात ११ जण जखमी झाले असून त्यांच्यावर मेडिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Views:
[jp_post_view]