साताऱ्यात मोठा अपघात! पुलाच्या कठड्याला धडकून बसचा भीषण अपघात, चालकासह १५ जण जखमी..

सातारा : कऱ्हाडहून सातारा दिशेकडे भरधाव जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
एसटी चालकाचा ताबा सुटल्याने शिवडे (ता. कऱ्हाड) येथील मांड नदीवरील पुलाच्या कठड्याला एसटी धडकून महामार्गावर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चालक व वाहकासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहे.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघटनाची माहिती मिळताच घटनास्थळी तेथील लोकांनी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती आहे.