शेतकऱ्यांनो सबसिडीवर ट्रॅक्टर घेताय? थांबा, झालाय कोट्यवधींचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या….


शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यात 8 ते 10 लाखांचा ट्रॅक्टर 90 टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून 1 लाख 30 हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून 3 लाख रुपये घेवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला भंडारा पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे.  आरोपीने राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशात ही जाळे पसरवून नागरिकांकडून कोट्यवधींची
माया जमवली.

मारोती अशोक नैताम असं आरोपीचे नाव आहे. उच्च शिक्षित असलेल्या मारोती नैतामला मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा बोलता येतात. तो मूळचा गडचिरोलीचा आहे. लखोबा लोखंडेने भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली इथं जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावाने कंपनी स्थापन करून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली.

शेतकऱ्यांनी सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी त्यांचे दागिने गहाण ठेवलेत, अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते. मात्र आता त्यांना धक्काच बसला आहे. याबाबत अनेक शेतकरी आता पुढे येत आहेत.

दरम्यान, भंडारा जिल्ह्या तसेच गोंदिया जिल्ह्यातील अनेकजण याचे शिकारी बनले आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे अशा योजनेबाबत पडताळणी करून माहिती घेणे आवश्यक आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!