टोमॅटोमुळे शेतकरी झाला करोडपती! दोन महिन्यांमध्येच कोटींची कमाई, वाचा जुन्नरच्या दाम्पत्याची यशोगाथा..
जुन्नर : टोमॅॅटोमुळे जुन्नर तालुक्यातील या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील हे शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील गायकर दाम्पत्यानं १२ एकरातील टोमॅटो पिकाच्या जोरावर सव्वा दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. गायकर दाम्पत्य गेल्या सात वर्षांपासून टोमॅटोची शेती करतात. यावेळी त्यांच्यासह इतर शेतकरी देखील लखपती झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांना फायदा मात्र झाला आहे.
या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात.
ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे. यामुळे त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच त्यांना एवढे पैसे शेतीतून मिळाले आहेत.
एकाच दिवशी ते १५ ते २० लाख रुपये घेऊन येतात. यामुळे नशीब देखील त्यांना साथ देत आहे. सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आहेत. तसेच ग्राहक खरेदी करताना विचार करू लागला आहे.
दरम्यान, टोमॅटो २०० रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. असे असताना ज्यांनी मागील दोन वर्षे तोटा सहन करून देखील टोमॅटो केला त्यांची मात्र दिवाळीचा झाली. राज्यासह संपूर्ण देशभर टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय. यामध्ये पुण्यातील ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर या शेतकरी दाम्पत्याने सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे.