महिलेचा घरात घुसून हात धरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न! सोरतापवाडीत एका प्रसिद्ध वकिलावर ऑट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल…!!

उरुळीकांचन : झोपलेल्या महिलेच्या घरात घुसून हात धरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रसिद्ध वकिलावर ऑट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार सोमवार (दि. 3) रोजी सकाळी महिलेच्या राहत्या घरात हा प्रकार घडला आहे.
सचिन शंकर सावंत( वय 44 वर्षे रा. सोरतापवाडी, ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , घरात महिला एकटी असल्याचे पाहून आरोपी सचिन सावंत हा घरात शिरला व ‘कोणाला काही बोलू नको व ओरडू नको’ असे म्हणून महिलेचा हात धरुन विनयभंग केला. त्यानंतर महिलेला मारहाण करून शिवीगाळ करून आरोपीने धमकी दिली आहे. या प्रकारानंतर महिलेने उरुळीकांचन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
या दाखल गुन्ह्याचा तपास दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस हे तपास करीत आहे.
Views:
[jp_post_view]