फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईल’चा दिला नारा…


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच.

 

मी कसा येतो हे तुम्हाला देखील चांगलाच माहितीये. असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

ते म्हणाले, आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.’ सध्या त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस हे बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

 

त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसापासून राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यांनतर शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!