मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ‘त्या’ योजनेचे पैसे थेट बँक खात्यावर येणार, जाणून घ्या….


मुंबई : राज्यात सुरु असणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे पैसे अगोदर मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालयात या योजनेचे पैसे येत होते.

नंतर ते लाभार्थ्यांना पैसे मिळतात. यासाठी अनेक दिवस खर्च होतात. आता नवीन निर्णयामुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. यामध्ये आता संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत.

शासनाच्या माध्यमातून हा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात येणार आहे. यामुळे आधीची जी प्रक्रिया होती ती सर्व प्रक्रिया आता रद्द होईल आणि कमी वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येईल. यामुळे सरकारकडून थेट पैसे पात्र व्यक्तीच्या खात्यावर येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो. यामुळे अनेकांना दिलासा मिळतो. मात्र पैसे येण्यास उशीर झाला तर त्याचे महत्व कमी होते.

यामुळे आता शासनाच्या महत्वकांक्षी योजनेच्या धर्तीवर इतरही काही योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची ही नवीन योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे. यामुळे याचा मोठा फायदा दिसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!