संजय राऊतांना कुणी दिली धमकी? फडणवीसांनी ‘त्या’ तरुणाबद्दल केला खुलासा….!
मुंबई : संजय राऊत यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. संजय राऊत यांनी त्यांना मिळालेल्या धमकीनंतर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
धमकी देणारा व्यक्ती हा पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुण्यातील एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.
यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहितीनुसार तरुणाने दारूच्या नशेत धमकी दिली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यामुळे आता फडणवीसांच्या वक्तव्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागात पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.