Facebook-Instagram Down : फेसबुक इन्स्टाग्राम फक्त दीड तास डाऊन झाल्यामुळे झुकेरबर्गना किती फटका बसला? आकडा वाचून डोळे होतील पांढरे..


Facebook-Instagram Down : फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन ॲप काल काही काळासाठी बंद पडले होते. त्यानंतर आता ते पुन्हा सुरू झाले आहे. काही काळासाठी सर्व उपकरणावरील अकाउंट बंद झाले होते. भरात या पुन्हा फेसबुक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्यानंंतर अनेकांंनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मेटा’चा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम तासभर बंद राहिले होते. यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचे एका दिवसात सुमारे ३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

यामुळे ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर, झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती एका दिवसात २.७९ अब्ज डॉलर कमी होऊन ती १७६ अब्ज डॉलर झाली. पण जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचे स्थान कायम आहे.

तसेच जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम तासभर बंद राहिल्याने मेटाचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. ज्यामुळे मार्क झुकेरबर्ग यांच्या निवळ संपत्तीत घसरण झाली. अमेरिकेतील शेअर बाजारात मेटाचे शेअर्स ४९०.२२ डॉलरवर बंद झाले.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सच्या यूजर्सना मंगळवारी रात्री या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात अडचणी आल्या होत्या. याव्यतिरिक्त मेटा क्वेस्ट यूजर्सना त्यांच्या हेडसेटमध्ये लॉग इन करताना समस्या आल्या. अनेक यूट्यूब यूजर्सनी प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्रुटी आल्याचेदेखील नोंदवले. Facebook-Instagram Down

या आऊटेज दरम्यान, यूजर्सनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर फेल्युअर टू लोडल, एरर पेजीस आढळल्याची नोंद केली. काही इन्स्टाग्राम यूजर्सनी नोंदवले की एरर असूनही ते अद्याप जुन्या स्टोरीज पाहू शकतात. दरम्यान, या बंद दरम्यान अनेक फेसबुक अकाऊंटस् आपोआपच अचानक लॉग आऊट झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!