धमाकेदार वाढ! अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी, वाचा आजचे नवीन रेट…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोने खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे भारतीय सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. काल बुधवार, १५ एप्रिल रोजी बाजार उघडताच सोन्याच्या दरात ३००० रुपयांची, तर चांदीच्या दरात १२,००० रुपयांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या सर्वच प्रकारांमध्ये मोठी सुधारणा दिसून आली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव २,८५४ रुपयांनी वधारून १,५२,८६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

दागिने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात २,६१४ रुपयांची वाढ होऊन तो १,४०,०२४ रुपयांवर स्थिरावला आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमतही २,१४१ रुपयांनी वाढून १,१४,६४९ रुपयांवर गेली आहे.

चांदीच्या दरात झालेली वाढ अधिकच धक्कादायक आहे. एकाच दिवसात चांदी १२,०३८ रुपयांनी महागली असून, सध्या चांदीचा प्रति किलो भाव २,४९,०१९ रुपयांवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वीच्या घसरणीनंतर अचानक आलेल्या या तेजीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही खळबळ उडाली आहे. १६ मार्च रोजी सोन्याचे दर काहीसे कमी होते, मात्र सण आणि लग्नसराईमुळे ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

ऑल इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी सोन्याच्या भविष्यातील दरांबाबत मोठी शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, १९ एप्रिल रोजी असलेल्या अक्षय तृतीयेपर्यंत मागणीत प्रचंड वाढ होईल. या वाढत्या मागणीमुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६२,००० रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. लग्नसराईसाठी प्रत्यक्ष सोन्याची गरज असलेल्या ग्राहकांमुळे बाजार आणखी गरम राहण्याची चिन्हे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!